"त्याग"
...............शशिकांत गुरव
जीवन अनमोल आहे
समाज कवडीमोल आहे
भिती पोटी मोडू नकोस
आयुष्याची बाग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग
समाजाच्या हिंसक वागण्याचा
समाजाच्या टोचून बोलण्याचा
कदाचित तुला
आला असेल राग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग
समाज सुखात साथ देत असतो
पण दुःखात समाज नेहमीच हसतो
दूर लोट तू ,
तो संशयी पाठलाग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग
परमेश्वराची लेखणी ,परमेश्वराची शाई
माझं असं माझ्याकडे काहीच नाही
तरी सुद्धा माझ्याकडे
काहीतरी माग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग
