🙏🙏नमस्कार , मालवणी कविता / मराठी कविता या वेबसाइटवर मी शशिकांत गुरव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे 🙏🙏

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

चवती सणाचो पाऊस



"चवती सणाचो पाऊस"

........................शशिकांत गुरव

पाऊसा तिया चवती सणाचो
इतको कित्याक पिसाटलसं
आमी तुझा काय केलू
जो आमच्या मरणार उठलसं

इलस तो इलस पुरा बिऱ्हाड घेवन इलसं
झाडाझुडपा घरादाराचो सत्यानास केलसं

'ढग' तुझो बापुस घडघडून इलो
पोराटोराक आमच्या धिसपाटून गेलो

'विज' तुझी आवस जोरात कडकाडली
तिच्यामुळे  घरातली लाईट सगळी गेली

'वारो' तुझो झिल सुसाट धावान इलो
घरा मांगरांची छपरा उडौवन गेलो

'धुक्या' तुझा चडू पाठसून हळु इला
डोळ्या पुडचा सगळा धुळकट करुन गेला

'सर' तुझी बायल बाचकत बाचकत इली
शेताभातात पाणी भरुन सगळा कुसौन गेली

'पुर' तुझो भावस पाटी ऱ्हवान इलो
फुललेलो संसार आमचो नाल्यात व्हवौन गेलो


घोव माझो भोळो

"घोव माझो भोळो" ..................शशिकांत गुरव इटमना झाली जल्माची, पदरात पडलो गुळो घोव माझो भोळो, तेच्यार शेजारणीचो डोळो...