🙏🙏नमस्कार , मालवणी कविता / मराठी कविता या वेबसाइटवर मी शशिकांत गुरव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे 🙏🙏

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

गाड्यावयलो पोर


"गाड्यावयलो पोर"

................शशिकांत गुरव

याक पोरग्या घाटात ,
इला मोट्या थाटत
जसोकाय तेच्याचंकडे
पैसो आसा अफाट

पायात हिलचे बुट,
आंगार मांडयेपर्यात सुट
गाड्यावयल्या पोराक इचारता
Which is the route ?

त्वांडभर ताबंडी लाली,
कानात काकनायद्यो बाली
गाड्यावयल्या पोराक इचारता
Hey ..you ....खुर्ची आहे का खाली?

मुरडत मुरडत चालना,
इंग्लिश मदसून बोलना
गाड्यावयल्या पोराक
तेच्यातला काय कळना.

केडल्याची केल्यान टिंगल,
डोळ्यार ठेयल्यान गॉगल
गाड्यावयल्या पोराक हुनता
"असं काय बघतोस काय पागल"

लेमलेटची खाल्यान गोळी,
ड्रायव्हराक दिल्यान टाळी
गाड्यावयल्या पोराक घातल्यान
इग्लिश मदसून गाळी.

तितक्यात,

कावळो वरसून  इलो,
पोरीरं चिरपान गेलो
गाड्यावयलो पोर तेवा
हसानहसान मेलो.

😂😂😂😂😂😂

घोव माझो भोळो


"घोव माझो भोळो"
..................शशिकांत गुरव

इटमना झाली जल्माची,
पदरात पडलो गुळो
घोव माझो भोळो,
तेच्यार शेजारणीचो डोळो

त्वांड कोणी धुवच्या आधी ,
शेजारीनं उभी दारात
दबक्या आवाजात हुनता ,
भावोजी आसत काय घरात?
        होय आसय आसय हुनता ,
        आमचो ह्यो खुळो
        घोव माझो भोळो ,
        तेच्यार शेजारणीचो डोळो

काम नसता कसला ,
तरी काम शोधुन काढतां
मुद्दाम मुद्दाम घोवाक माझ्या ,
आपल्या कडे वढतां
         कोणाक माहीती घरात व्हरान,
         कराता कसलो चाळो
         घोव माझो भोळो ,
         तेच्यार शेजारणीचो डोळो

तासातासाक येता मुरडत ,
बायवर भरुक पाणी
घोवाक माझ्या बघुन हुनता ,
जोरात जोरातं गाणी
          मिया आपला दार ढापून ,
          कानात घालतय बोळो
          घोव माझो भोळो ,
          तेच्यार शेजारणीचो डोळो

जेवाजेवा घोव माझो ,
परड्यात काम करता
तेवा शेजारीन आपलो पदर ,
हळुच बाजुक सारता
           आपली उघडी कमार दाखवन ,
           घोवाक लायता लळो
           घोव माझो भोळो ,
           तेच्यार शेजारणीचो डोळो

माका चोरुन घोवाक हुनता ,
भावोजी तुमी भारी
तुमच्या मनान तुमची बायल ,
व्हयी होती गोरी
           गोऱ्या घोवाक माझ्या देवा ,
           कर थोडो काळो
           घोव माझो भोळो ,
           तेच्यार शेजारणीचो डोळो

मिया आता घोवार बारीक ,
लक्ष ठेवन असतय
तो जिसर बसता तेच्या ,
बाजूक मिया बसतय
           बघतय कसा पळयता बोडक्या ,
           माझ्या कुंकवाचो टिळो
           घोव माझो भोळो ,
           तेच्यार शेजारणीचो डोळो



*🙏🙏💐💐* मालवणी कविता/मराठी कविता या वेबसाईट्सवर मी शशिकांत गुरव आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत करत आहे *💐💐🙏🙏*

भेट


 "भेट"
..........शशिकांत गुरव

त्या दिसा तिया मिया दोघाय भेटलू
दोन मिनटाची भेट तासभर रेटलू........!!

पाऊसातलो एक ' दिस '
तुका केलय मिया मिस
तिया झालय कासाविस
घेतलय माझो किस
त्या पाऊसात तिया मिया एकामेकाक खेटलू
दोन मिनटाची भेट तासभर रेटलू..........!!

कॉलेजात अॉफ ' तास '
तिया हुतलस वायचं बास
भरयलस माका घास
माका पटलो तुझो इस्वास
कॉलेजातसून तिया मिया दोघाय वंगडान सुटलू
दोन मिनटाची भेट तासभर रेटलू.............!!

पयलाडची ती ' शेळ '
तिया खेळलस नवो खेळ
तुझो नाय ताळमेळ
भेटाकं लागलो तुका येळ
त्या शेळीत तिया मिया एकामेकाक लुटलू
दोन मिनिटाची भेट तासभर रेटलू...............!!

तीनसानाची ती ' रात '
झालो मोटो अपघात
तुका लागलो चुकान हात
तिया दिलय माका साथ
त्या राती तिया मिया दोघाय पेटान उठलू
दोन मिनटाची भेट तासभर रेटलू............!!

तो योक ' आयतवार '
सगळीठयं हाहाकार
माझ्यार झालो प्रहार
तुझ्या गळ्यात पडलो हार
त्या आयतवारा तिया मिया दोघाय तुटलू
दोन मिनटाची भेट तासभर रेटलू..............!!
💔😭💔😭💔😭💔



त्याग


"त्याग"
...............शशिकांत गुरव

जीवन अनमोल आहे
समाज कवडीमोल आहे
भिती पोटी मोडू नकोस
आयुष्याची बाग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग

समाजाच्या हिंसक वागण्याचा
समाजाच्या टोचून बोलण्याचा
कदाचित तुला
आला असेल राग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग

समाज सुखात साथ देत असतो
पण दुःखात समाज नेहमीच हसतो
दूर लोट तू  ,
तो संशयी पाठलाग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग

परमेश्वराची लेखणी ,परमेश्वराची शाई
माझं असं माझ्याकडे काहीच नाही
तरी सुद्धा माझ्याकडे
काहीतरी माग
पण एवढ्याश्या गोष्टीसाठी
करु नकोस जीवनाचा त्याग

एक स्वप्न

"एक स्वप्न"
..............शशिकांत गुरव

एकटेपणाने मला खुणावले
पाहुन तुला माझे डोळेच पाणावले
कोणीही नव्हतं तुझ्या घरी
एकटाच उभा होतो पडवीच्या शेजारी

चौफेर सुटला वारा, त्यात संशयाचा मारा
कधी तुझ्या , कधी माझ्या मिठीचा निवारा
झगडाझगडीत झाला भावनांना स्पर्श
दोघांच्याही चेहऱ्यावरती खुलला हर्ष

डगमगले ओठ, थरथरले पाय
तेव्हढ्यात हाक आली 'गो बाय'
शब्द पडताच कानी वळली बोबडी
घळणीच्या टोकावरुन घेतली खाली उडी

तु मात्र हाकेला हाकच दिलीस
आवाजा वरुन हाकेची पारख केलीस
माझी स्थिती पाहुन तुला हसणं आवरलं नाही
पण हळूच तू विचारलंस ,तुला लागलं तर नाही

तुझ्या या आपुलकीने पडलो मी आजारी
पाहिलं एक स्वप्न पडवीच्या शेजारी

वेगळेपणा

                  "वेगळेपणा"
                        .............शशिकांत गुरव

मी कधीच नाही केलं,
तुला घरच्यांपासुन वेगळं
तुझ्या घरच्यांनीच केल,
तुला माझ्यापासुन वेगळ

          माझं नाव ओठाखाली
          तु दडवलं नसत
          तर घरच्यांनी तुला
          रात्रभर रडवलं नसतं

घरच्यांच म्हणणं
बरोबरच आहे
आजकाल परिस्थितीच
तशी आहे

           खऱ्याच्या सोबत
           कुणीतरी एक आहे
           खोट्याच्या बरोबर
           मात्र अनेक आहेत

घडली एखादी चुक,
नकळतं माझ्या हातातुन
पण त्या चुकीला नेमंक
धरलंस तु मुद्दामहुन

           केलेली चुक एवढी
           मोठीही नव्हती
           कि जिच्यामुळे तु
           बदनाम होणार होतीस

एका शुल्लक चुकीसाठी
जोडलेलं प्रेम तोडलंस
जिवंत असून सुद्धा ,
तु मला मातीत गाडलंस

           माझ्याशी न बोलण्याचा
           तुझा तुच विचार केलास
           मला सोडून जिण्याचा
           तुझा तुच निर्णय घेतलास

जोडण्यासाठी मी
खुप प्रयत्न केला
पण कधीच नाही आली
माझी दया तुला

           तु कशी काय तोडलीस
           तुझी माझी गाठ
           चालतच राहीलीस
           न पाहताच फिरवून पाठ

एकटी पडवीच पाहत होती
हे घडलेलं सगळं
मी कधीच नाही केलं
तुला घरच्यांपासून वेगळं
तुझ्या घरच्यांनीच केलं
तुला माझ्यापासुन वेगळं  

विसर मला


"विसर मला"
..................शशिकांत गुरव

हसतो आहे मला पुढचा दरवाजा
ज्यावर केली होती विरळी मजा
बोलावतं आहे कडेची चौपाई
जिच्यावर कधी काळी केली होती घाई
सताड भिंती रोज खुणावतात मला
तरी पण म्हणतेस तु विसर मला   ।

हळुच सांगतो पुर्वेचा कोपरा
परत एकदा तरी मला वापरा
धीर देऊ पाहते डोईवरील छत
ते मात्र स्थिर आहे पाहून केविलवाणी गत छतावरील कौलांनी अश्रूंचा वर्षाव केला
तरी पण म्हणतेस तु विसर मला     ।

तांडव नृत्य करते समोरची खिडकी
कारण तिने पाहिली बाजू माझी पडकी
एकमेव साक्ष देतो भिंतिवरील आरसा
टिपलेल्या क्षणांचा त्यालाच अनूभव फिरसा
भिंतीचा मात्र काहि रंग माझ्यासोबत आला
तरी पण म्हणतेस तु विसर मला   ।

करायचे आहे तुला अजून खुप काही
घड्याळ सांगते आहे अजून वेळ गेली नाही
चित्राच्या चौकटी जागच्या हलत नाही
म्हणूनच त्या तुला काहि सांगु शकत नाही उंबरठा मात्र जशास तसा अजूनही ओला
तरी पण म्हणतेस तु विसर मला  ।

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

तुझी भाषा

"तुझी भाषा"

...... शशिकांत गुरव

तिया मोठ्यानं बोल्लसं  ,

हळू बोल्लसं ,

नाय बोल्लसं काय

हरकत नाय ...!

तुझे ओठ थरथरले

आपसूक कळता माका

हेच्यात काय

प्रश्नचं नाय ...!

शेवटी माझ्याशिवाय

ही भाषा

दुसऱ्या कोणाक

कळाचीच नाय .....!

आणि भिया नको

मिया असताना

दुसरो कोण हडे

फिरकाचो नाय ....!

*🙏🙏💐💐* मालवणी कविता/मराठी कविता या वेबसाईट्सवर मी शशिकांत गुरव आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत करत आहे *💐💐🙏🙏*

काय अडना नाय

"काय अडना नाय
काय घडना नाय "

......... शशिकांत गुरव

तसा तुझ्याशिवाय
माझा काय अडना नाय .....!
फक्त इतक्याच कि पहिल्या सारख्या
हिसर काय घडना नाय ......?

तिया तेव्हा भेटलेलसं
खेटान माका बसलेलसं
तुझा माझ्यार प्रेम आसा
सांगान लोकात हसलेलसं
आता
चार चौघात सगळा कायता
दडयलय तरी दडना नाय
तसा तुझ्याशिवाय
माझा काय अडना नाय ......!
फक्त इतक्याच कि पहिल्या सारख्या
हिसर काय घडना नाय .....?

एसटीत बाजूक जागा दिलसं
कोलेजात सोबतीन इलसं
लोकांच्या नजरे आड
 चोरुन गुलूगुलू बोल्लसं
आता
तिया सोबत नाय हुनान
तितकोसो फरक पडना नाय
तसा तुझ्याशिवाय
माझा काय अडना नाय ....!
फक्त इतक्याच कि पहिल्या सारख्या
हिसर काय घडना नाय .....?

भावस तुझो करी दादागिरी
आवस गावभर बोब मारी
कसो बसो एकटो मिया
तुका लागान सगळा आवरी
आता
तुझी आवस माझ्या
नावानं बळयानी रडना नाय
तसा तुझ्याशिवाय
माझा काय अडना नाय ....!
फक्त इतक्याच कि पहिल्या सारख्या
हिसर काय घडना नाय ...?

पैसो आडको  न्हेलसं
लूटून सगळा गेलसं
छातीतला काळीज सोडून
फूसान मोकळो केलसं
आता
उरला सुरलेला काळीज सुद्धा
तुझ्या नावान धडधडना नाय
तसा तुझ्याशिवाय
माझा काय अडना नाय ....!
फक्त इतक्याच कि पहिल्या सारख्या
हिसर काय घडना नाय ....?

पिरेम

पिरेम

......शशिकांत गुरव

पिरेम जेवा कळला तेवा
तिया तळमळा होतय
मिया  हळहळा होतय
लोका कुजबूजा होती

पिरेम जेवा रुळला तेवा
तिया थरथरा होतय
मिया वरचढ होतय
लोका सैरभैर होती

पिरेम जेवा जूळला तेवा
तिया अडखळा होतय
मिया सुळसुळा होतय
लोका बुचकाळत होती

पिरेम जेवा वळला तेवा
तिया कळकळा होतय
मिया वळवळा होतय
लोका खुलखुला होती

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

आंबोली



"अशी असे अमुची आंबोली"

....... शशिकांत गुरव

सह्याद्रीचा शिरोमणी तो
अमुचा आंबोली घाट
देश विदेशात ज्याचा
बहुरंगी थाट

गावाच्या सुरवातीला भेटे
स्थानबध्द पुर्वीचा वस
कित्येक भाविकांचे तेथे
पुर्ण झाले नवस

कोकणाचे अगम्य दृश्य
दिसते महादेव गडावरनं
सुर्यास्ताचे दर्शन घेता तेथे
फिटती डोळ्यांची पारणं

प्रभु राम, प्रभु येशू ,देव दत्त
असे वरीष्ठ देवतांचे सत्र
अमुच्या बाजारवाडीत
भाविकांना मिळतात एकत्र

गावाच्या मध्यावरती वसली
आई माता माऊली
तिच्या कृपेने सुखावली
चौहू दिशा आंबोली

भारतदास संत मोठे होवून गेले
राघवेश्वर मंदिरी
त्यांचि आध्यात्मिक किर्ती
साऱ्या घाट माथ्यावरी

अमुची हिरण्यकेशी माता
दरी खोऱ्यातुन वाहते
तहानलेल्या वाटसरूंची
ती काया शितल करते

ओघळनारा खळखळनारा
अमुचा नांगरतास धबधबा
त्याचा असे संपुर्ण
नव युवकांत दबदबा

थंड हवा गार वारा अशी
असे अमुची आंबोली
म्हणूनचं वेड्यागत सारी
दुनिया हिला भुलली

आंबोली - शबय शबय


" शबय शबय "

.... शशिकांत गुरव

उजवाडाच्या पारार
शेजाराच्या दारार
उट मरे पावण्या
माघूया शबय शबय ......!

मामाच्या वाड्यार
वडापावच्या गाड्यार
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय ......!

आयलाडच्या वाडयेर
पयलाडच्या माडयेर
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय ......!

गावकाराच्या वाडयेत
बेबग्याच्या पडयेत
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय ......!

रस्त्यार आडये
गुटाळून साडये
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय .....!

फिर गारगार
तोंडार शीरा मार
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय .....!

रंगात माखान
गळो गेलो सुकान
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय ,....!

सरभरीत मन
पोटात नाय अन
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय .....!

कोकणाची व्यथा
बुडत चल्ली प्रथा
चल मरे पावण्या
माघूया शबय शबय ......!

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

स्वप्नातील सहवास

"स्वप्नातील सहवास"

.... शशिकांत गुरव

स्वप्न पाहीलं एक
सुखी दोघांनी मिळूनी

त्या स्वप्नांच्या राज्यात
दोघांशिवाय नाही कुणी

वास्तवात ते स्वप्न
अगदी वेगळचं होतं

आजही अबाधीत आहे
पुर्वीहि तसचं होतं

मरण देखील त्या स्वप्नाला
तोडू शकत नव्हतं

जीवन सुद्धा त्या स्वप्नाला
अडवू शकत नव्हतं

ते स्वप्न कधी भंगल
मला समजलचं नाही

मला तिथून केव्हा घालवलस
ते कळलचं नाही

त्या स्वप्नांच्या राज्यात
दिसलिस एकटिच चालताना

माझी कधी आठवण येत नाही का
तिथे वावरताना?

तु एक चुक केलीस त्याची
 पुनरावृत्ती मी करणार नाही

मला दुखवलसं म्हणून
मी तुला दुखवनार नाही

आज मी दुःखात आहे
तु सुखात असणे शक्य नाही

त्या स्वप्नांच्या राज्यात आता
तुझ्या एकटी शिवाय कुणी नाही

माझं सुख तुला देतो
तु तुझं दुःख मला दे

परत एकदा तरी मला
स्वप्नांच्या राज्यात घे

निदान त्या स्वप्नात येवून
 रागावू तरी नकोस

तुझा तेव्हढाचं सहवास
हिरावू तरी नकोस

सावध माणसा

सावध माणसा !

..... शशिकांत गुरव

सावध माणसा ! आता सावध माणसा !
जगात नाही उरला कशाचा भरोसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

जमिनीच्या तुकड्यासाठी घेशील गुप्ती आणि सुरी
नाते विसरुनी करशील भावाभावात हाणामारी
भ्रष्टाचारी पुढाऱ्यांची गुलामी करशील पैशासाठी
एव्हढं सगळ का करतो? वितभर पोटासाठी
तिळतिळ तुटण्याचा अनुभव तुला नाही फारसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

अलिशान घरासाठी घेशील कर्जाचे डोंगर माथी
झोपायचे आहे तुला फक्त एका पलंगावरती
सगळेच आहेत इथे परतीचे प्रवासी
कुणीच नाही इथे कायमचा रहिवासी
जग म्हणजे निव्वळ काचेचा आरसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

मोहापायी होशील पुरता लाचारी
बाई साठी होशील घरातला आचारी
संसार प्रपंच्यासाठी रडशील वेळोवेळी
कुणीच नाही साथी येणार अंतिच्यावेळी
मरणानंतर तुझ्या करतील पुतळ्याचा बारसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

तरुणपणा संपेल होशील अशक्तापरी
त्याच पलंगावरी पडशील एक दिवस आजारी
पलंगावरुनी करशील देवाला रोज नवस
जग सोडून जायचे आहे सगळ्यांना एक दिवस
भुतकाळ आठवशील मरणाच्या दिवसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

दिवाळी मालवणी कविता

"अशीच एकदा दिवाळी इली"

          ....शशिकांत गुरव

अशीच एकदा दिवाळी इली
फक्त  कारटा फोडून साजरी केली

दिवाळेच्या आदि
सगळे यशीत जमले

राती नरकासूर करूया
हुनान बेत आखले

कोणी हाडले कपडे
कोणी हाडले गवताचे काडये

कोणी हाडल्यानी आपल्याच
बायलांचे फाटके साडये

सगळा कायता काटयेक
गुटाळून नरकासुर केल्यानी

लायटीच्या खांब्या कडे
व्हरान वटगुन ठेयल्यानी

रात जागाक व्हयी
हुनान पार्टी ठेयल्यानी

पार्टी खावन जाल्यार
सुस निजान दिल्यानी

खायलावटातल्या पोरांनी
हळूच  यवन बघल्यानी

आमी निजलेले बघून
नरकासूर आमचो चोरल्यानी

भिनभिनाक कोणाक तरी
वायच जाग  इली

उटा उटा आमचो
कोणी नरकासुर हेल्यानी

बोब तेची  ऐकान
सगळे तडातड उठले

डोळे फुसत फुसत
खांबा कडे जमले

पयलाडचे खायलावटातले
पोरगे  लागले नाचाक

नरकासुर  नाय हुनान
आमका लागले हसाक

आमी  आपले लाजेन
सगळा सोशीत होतू

पुरावो असलेलो तर
तेंची साला काढणा होतू

त्याच वर्षी आमची
अशीच गेली दिवाळी

फक्त खाल्लू पोहे
आणि वाकडी रताळी

सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

आंबोलेचो पावस

आंबोलेचो पावस इलो...
.....शशिकांत गुरव

आंबोलेचो पावस इलो...
 भिजान घेया
चिखल मातीयेत लोळानं घेया

झाडात झाड मिसळयल्यानं
वाऱ्यानं ढगाक उसळयल्यानं
तुमी तेच्यात घुसळानं घेया
आंबोलेचो पावस इलो ...भिजानं घेया

टिप टिप पावळी गळयता
ताल सुर नवो धरता
तेच्या तालार नाचानं घेया
आंबोलेचो पावस इलो .....भिजानं घेया

कामधंदो रोजचोच ओ असता
मनात भिजान सारख्या दिसता
हौस आपली पूरवूनं घेया
आंबोलेचो  पावस इलो ....भिजानं घेया
'

घोव माझो भोळो

"घोव माझो भोळो" ..................शशिकांत गुरव इटमना झाली जल्माची, पदरात पडलो गुळो घोव माझो भोळो, तेच्यार शेजारणीचो डोळो...