"अशी असे अमुची आंबोली"
....... शशिकांत गुरव
सह्याद्रीचा शिरोमणी तो
अमुचा आंबोली घाट
देश विदेशात ज्याचा
बहुरंगी थाट
गावाच्या सुरवातीला भेटे
स्थानबध्द पुर्वीचा वस
कित्येक भाविकांचे तेथे
पुर्ण झाले नवस
कोकणाचे अगम्य दृश्य
दिसते महादेव गडावरनं
सुर्यास्ताचे दर्शन घेता तेथे
फिटती डोळ्यांची पारणं
प्रभु राम, प्रभु येशू ,देव दत्त
असे वरीष्ठ देवतांचे सत्र
अमुच्या बाजारवाडीत
भाविकांना मिळतात एकत्र
गावाच्या मध्यावरती वसली
आई माता माऊली
तिच्या कृपेने सुखावली
चौहू दिशा आंबोली
भारतदास संत मोठे होवून गेले
राघवेश्वर मंदिरी
त्यांचि आध्यात्मिक किर्ती
साऱ्या घाट माथ्यावरी
अमुची हिरण्यकेशी माता
दरी खोऱ्यातुन वाहते
तहानलेल्या वाटसरूंची
ती काया शितल करते
ओघळनारा खळखळनारा
अमुचा नांगरतास धबधबा
त्याचा असे संपुर्ण
नव युवकांत दबदबा
थंड हवा गार वारा अशी
असे अमुची आंबोली
म्हणूनचं वेड्यागत सारी
दुनिया हिला भुलली
