🙏🙏नमस्कार , मालवणी कविता / मराठी कविता या वेबसाइटवर मी शशिकांत गुरव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे 🙏🙏

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

सावध माणसा

सावध माणसा !

..... शशिकांत गुरव

सावध माणसा ! आता सावध माणसा !
जगात नाही उरला कशाचा भरोसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

जमिनीच्या तुकड्यासाठी घेशील गुप्ती आणि सुरी
नाते विसरुनी करशील भावाभावात हाणामारी
भ्रष्टाचारी पुढाऱ्यांची गुलामी करशील पैशासाठी
एव्हढं सगळ का करतो? वितभर पोटासाठी
तिळतिळ तुटण्याचा अनुभव तुला नाही फारसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

अलिशान घरासाठी घेशील कर्जाचे डोंगर माथी
झोपायचे आहे तुला फक्त एका पलंगावरती
सगळेच आहेत इथे परतीचे प्रवासी
कुणीच नाही इथे कायमचा रहिवासी
जग म्हणजे निव्वळ काचेचा आरसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

मोहापायी होशील पुरता लाचारी
बाई साठी होशील घरातला आचारी
संसार प्रपंच्यासाठी रडशील वेळोवेळी
कुणीच नाही साथी येणार अंतिच्यावेळी
मरणानंतर तुझ्या करतील पुतळ्याचा बारसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

तरुणपणा संपेल होशील अशक्तापरी
त्याच पलंगावरी पडशील एक दिवस आजारी
पलंगावरुनी करशील देवाला रोज नवस
जग सोडून जायचे आहे सगळ्यांना एक दिवस
भुतकाळ आठवशील मरणाच्या दिवसा
सावध माणसा ! आता सावध माणसा !

घोव माझो भोळो

"घोव माझो भोळो" ..................शशिकांत गुरव इटमना झाली जल्माची, पदरात पडलो गुळो घोव माझो भोळो, तेच्यार शेजारणीचो डोळो...