🙏🙏नमस्कार , मालवणी कविता / मराठी कविता या वेबसाइटवर मी शशिकांत गुरव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे 🙏🙏

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

स्वप्नातील सहवास

"स्वप्नातील सहवास"

.... शशिकांत गुरव

स्वप्न पाहीलं एक
सुखी दोघांनी मिळूनी

त्या स्वप्नांच्या राज्यात
दोघांशिवाय नाही कुणी

वास्तवात ते स्वप्न
अगदी वेगळचं होतं

आजही अबाधीत आहे
पुर्वीहि तसचं होतं

मरण देखील त्या स्वप्नाला
तोडू शकत नव्हतं

जीवन सुद्धा त्या स्वप्नाला
अडवू शकत नव्हतं

ते स्वप्न कधी भंगल
मला समजलचं नाही

मला तिथून केव्हा घालवलस
ते कळलचं नाही

त्या स्वप्नांच्या राज्यात
दिसलिस एकटिच चालताना

माझी कधी आठवण येत नाही का
तिथे वावरताना?

तु एक चुक केलीस त्याची
 पुनरावृत्ती मी करणार नाही

मला दुखवलसं म्हणून
मी तुला दुखवनार नाही

आज मी दुःखात आहे
तु सुखात असणे शक्य नाही

त्या स्वप्नांच्या राज्यात आता
तुझ्या एकटी शिवाय कुणी नाही

माझं सुख तुला देतो
तु तुझं दुःख मला दे

परत एकदा तरी मला
स्वप्नांच्या राज्यात घे

निदान त्या स्वप्नात येवून
 रागावू तरी नकोस

तुझा तेव्हढाचं सहवास
हिरावू तरी नकोस

घोव माझो भोळो

"घोव माझो भोळो" ..................शशिकांत गुरव इटमना झाली जल्माची, पदरात पडलो गुळो घोव माझो भोळो, तेच्यार शेजारणीचो डोळो...